आई हि एक अशी व्यक्ती आहे जि सगळ्यांनाच प्रिय असते, कारण ती आपल्या वर सगळ्यात जास्ती प्रेम करते, म्हणून तर सांगितले आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. तर मित्रांनो आज आम्ही आई वर एक सुंदर मराठी निबंध आणला आहे तो तुम्ही नक्की वाचा.
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
आई हा दोनच अक्षरी शब्द आहे, पण तो किती थोर आहे, हे आपल्याला या विधानात सांगितले आहे. आईचे महात्म्य अत्यंत योग्य शब्दात वर्णन केले आहे. एखादा त्रीमुवनाचा जरी मालक झाला तरी जर त्याला आई नसेल तर तो त्रीमुवनाचा स्वामी भिकारीच म्हटला पाहिजे.
आईला हि थोरवी जि प्राप्त झाली ती उगीच नव्हे. आई मुलांन करिता काय करत नाही ? सर्व काही करते. लहानपणी दुध पाजण्यापासून ते पालन पोषण आणि शिक्षण या सर्व गोष्टी आई आपल्या मुलांनसाठी करते. मुलांनच्या सुखासाठी ती अहोरात्र काबाडकष्ट करते. मुलांना थोडे जरी दुख झाले तरी तिच्या मनाला अनंत यातना होतात.
मुले किती हि वाईट वागली तरी आई त्यांच्यावरच माया करते. एका मुलाने आपल्या आईचे काळीज कापून हातात घेतले व तो रस्त्याने पळत जाऊ लागला. पळता-पळता ठेच लागून तो पडला व ते काळीज त्याच्या हातून खाली पडले. त्या काळजातून आवाज आला "बाला पडलास कारे ? फार लागले नाही ना तुला !". आईची आपल्या मुलांनवर प्राणा पलीकडे माया असते हेच या गोष्टीतून सिद्ध होते.
आईने केलेली ज्वारीची भाकरी खाण्यात केवळ आनंद असतो ? स्वर्गातील अमृतही तिच्यापुढे तुच्छ, आईने मारलेली हाक किती प्रेमाने ओथंबलेली असते, किती गोडवा असतो तीचात. मुरब्बी गायकांच्या गाण्यातहि इतका गोडवा नसतो. आईने मायेने पाठीवरून फिरवलेला हात, त्याची सर-सर कशालाच येणार नाही. जेवण झाल्यावर हात धुवून तो आईच्या पदराला पुसण्यात किती आनंद असतो. एक न दोन आईची प्रत्येक गोष्ट पृथ्वीमोलाची असते.
आईच्या सहवासातच हे सर्व सुख मिळते. म्हणून ज्याला आई नाही ज्याला मातृसुख नाही तो खरोखर दूरदयवी आहे. एखादा जगातील सर्व संपतीचा मालक असून त्याला आई नसेल तर तो कमनशिबीच असेल, मात्र एखाद्या गरीब मजूर असूनही ज्याला आई आहे तो श्रीमंत आहे. कारण "मातृ प्रेमाच्या सुखाचे धन हेय सर्व श्रेष्ठ धन" आहे ते ज्याला आहे तोच खरा धनवान. नाहीतर तो महान श्रेष्ठ असला तरी तो आईविना भिकारीच.
समाप्त
तर मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला ? आणि तुम्हला माझी आई हा मराठी निबंध हवा असेल तर इथे click करा.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९आणि १० ची मुळे आपल्या अभ्यासासाठी उपोग करू शकतात.
तसेच हा निबंध खालील दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.
- आई वर मराठी निबंध
- आई निबंध
- आई चे मोल
धन्यवाद, मित्रांनो तुम्हला हा निबंध कसा वाटला ?, तसेच जर तुम्हाला कोणत्याहि मराठी विषयावर निबंध हवा असेल तर खाली comment करून सांगा.
2 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाJdhfht
Jttjt
Thank you :)
हटवा