मरावे पण कीर्तीरूपे उरावे हि म्हण आपल्यांना सागते कि आपण किती आयुष्य जगले हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगले त्यामदे असे काही चांगले कार्य केले पाहिजे कि लोक आपल्यांना, आपल्या मृत्यू नंतर पण स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील.
मरावे पण कीर्ती रुपाने उरावे
मरावे पण कीर्तिरूपे उरावे हे समर्थ रामदासांचे बोधवाचन आहे. समर्थांनी हाय छोट्या शब्दात परंतु अतिशय मोलाचे उपदेश यामध्ये केलेला आहे.
मनुष्याने मारावे नव्हे, मनुष्य हा केव्हा तरी मरणारच परंतु तरी सुद्धा मनुष्य एकप्रकारे जिवंत राहू शकतो ते म्हणजे कीर्तीच्या रूपाने. मनुष्य शरीराने जरी मरण पावला तरी तो कीर्तीरूपाने उरला पाहिजे.
यासाठी काय करावे लागेल ? उत्तर अगदी सोपे आहे. या साठी अनेक सत्कृत्ये करावे लागतील इतकी सत्कृत्ये कर्वे लागतील कि ज्यायोगे आपली कीर्ती सर्वत्र होईल व आपण मरण पावलो तर लोक आपले नाव घेत राहतील.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधीजि, लोकमान्य टिळक, झाशीची राणी वगेरे व्यक्ती मरण पावल्या पण आजही त्यांची कीर्ती शिल्लक आहे. म.गांधी, नेहरू, टिळक यांनी भारतीय स्वातंत्रा करिता अपार कष्ट घेतले. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मा करिता स्वताच्या प्राणाचा त्याग केला. झाशीची राणी एक स्त्री असून इंग्रजांशी धेर्याने लढली. एक ना दोन, अशे किती तरी व्यक्ती अश्याप्रकारे कीर्तीशाली बनल्या व अमर झाल्या.
या आदर्शी व्यक्ती पासून धडा घेऊन व समर्थ रामदासांचा उदेश मानत प्रत्यकाने असे वागण्याचा प्रयत्न करावा.
नुसते जन्माला येणे व आयुष्य संपल्यावर मरून जाने अश्या जीवनाचा काही अर्थ नाही असे जीवन तर इतर प्राणीही जगतात. मग मनुष्याच्या जीवनात काय फरक राहिला ? यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात अश्या प्रकारे जगावे कि शरीराने मरून सुद्धा तो कीर्तीरूपाने जिवंत राहिला पाहिजे.
समाप्त.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा निबंध आम्हाल खाली comment करून सांगा. तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुळे आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच जर तुम्हाला कोणत्या हि इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला comment करून सांगा. धन्यवाद.
0 टिप्पण्या