परीक्षा द्याला कोणाला आवडते, मला तर नाही आवडत तेव्हाच आज मराठी निबंध "नकोत्या परीक्षा" हा मराठी निबंध घेऊन आले आहेत. तर चला निबंधाला सुरवात करूया.
नकोत्या परीक्ष्या.
आम्हा मुलांची खरोखर किती मजा असते ! सकाळी उठावे नियमित कामे उरकून शाळेत यावे. संध्याकाळी खूप-खूप खेळावे रात्री आरामशीर झोपावे. पण ह्या सगळ्या मजेची नासाडी करणारी एक गोष्ट मधून-मधून आम्हा मुलांवर डोळे बटारीत असते, अहो कोण असणार ती ? परीक्षाच.
नियमित काम चालल असतांना अचानक हेडमास्तरांची नोटीस विजे प्रमाणे कोसळते. दिनांक अमुक-अमुक पासून ते अमुक तारिक पर्यंत परीक्षा सुरु, आपल्या शाळेची परीक्षा होणार आहे तरी सर्व विद्यार्थी परीक्षेस बसून चांगळ्या गुणांनणी पास होण्याच्या प्रयत्न करावा. एखादे सुंदर असे स्वप्न बगत असतांना आपल्याला कोणी येऊन झोपेतून उठवते तर किती राग येतो, पण आपण करणार काय ?.
हेडमास्तरांन कडून आलेल्या ह्या सूचनेचा मोठा परिणाम होतो. सगळा दिनक्रमच बदलून जातो, परीक्षेची तारीख सारखी-सारखी डोळ्यापुढे नाचू लागते. मग मी काळजीपूर्वक गुरुजींच्या वर्गातील शिकवण्या कडे लक्ष देऊ लागतो खोड्या करणे ओपआप बंद होतात. सर्व विषय डोळ्यापुढे थैमान घालू लागतात.
गणितातील निरनिराळी उदाहरणे, भूमितीतील त्रिकोण चौकोन, शास्त्रातील प्राणवायू, इंग्रजी पुस्तकातील कधीच न समजणारे धडे आणि कधीही न लक्षात राहणाऱ्या इतिहासाच्या तारखा. हे सगळे पास होण्या साठी पाठ करायला लागते, मग मित्रांन कडून पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागतो. खेळणे सोडून संपूर्ण दिवस उत्तरांचा शोध घ्यावा लागतो.
पहाटे उठून अभ्यास सुरु करायचा तो थेट शाळेची वेळ होईपर्यंत. तरी पण खेळ बंद शाळा सुटली कि लवकरात लवकर घरी जायचे आणि थोड्या वेळाने जेवण आवरून परत अभ्यासाला बसायचे, रात्र भर जागरण मग तो दिवस उगवतो, मी गडबडीने शळेत जातो कधी कधी काही लेखन साहित्य घरीच विसरतो, मग तर माझी फारच तारांबळ उडते.
मनातल्या मनात मी परीक्षे ला शिव्या देऊ लागतो. असे वाटते नकोत्या परीक्षा पद्धती बंद करून टाकाव्या. सगळ्यांना पास करू वरच्या वर्गात टाकावे. पण आमचे ऐकणार कोण ! परीक्षा तर होताच राहणार आणि आमची फजीतीही होताच राहणार. जागरणे करावीच लागणार. खेळात अडथला येनारच आणि परीक्षा आपल्या आनंदी जीवनाची नासाडी करणारच.
समाप्त.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा नकोत्या परीक्षा मराठी निबंध, आणि तुम्हाला परीक्षा आवडतात का ? आम्हाला खाली comment करून नक्की सांगा.
हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध "परीक्ष्या नसल्या तर" ह्या विषयावर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
तसेच जर तुम्हाला कोणत्या हि मराठी विषयावर निबंध हवा असेल तर खाली comment करून आम्हाला कळवा. धन्यवाद.
0 टिप्पण्या