नमस्कार मित्रांनो आज Marathi Nibandh रात्रीच्या निसर्गा वर सुंदर मराठी निबंध घेऊन आला आहे, ह्या निबंधा मधे केलेले निसर्गाचे वर्णन तुम्हाला नक्की आवडेल.
निसर्ग - चांदण्या रात्रीचा देखावा.
काही लोक भल्या पहाटे फिरायला जातात. काही लोक संध्याकाळी फिरायला जातात. पण मी मात्र फिरायला जाण्या एवजी खेळतो. मला नाही आवडत फिरायला जाणे. पण एक दिवशी जेवण झाल्यानंतर सहज बाहेर पडलो. बरोबर मित्र रमेश होताच. वरती बगतले तर मला मोठा चंद्र प्रकाशाने लख-लखता दिसला. शहरा बाहेर थोडा फेरफटका मारायचा असे आम्ही ठरवले.
त्यावेळेचे वातावरण असे होते कि आम्हाला बाहेर त्या चंद्र प्रकाशत फिरव असे वाटले. तेजस्वी चंद्र आकाशात दिमाखाने डोलत होता. त्याच्या भवती असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. आकाश काळेघोर दिसत होते.
चंद्रप्रकाश सगळ्या भू-तलावर पडला होता. तो इतका प्रभावी होता कि दिव्याची सुद्धा रस्त्यावर आवशकता वाटत नव्हती गावाबाहेर दूरवर आल्या नंतर रस्त्यावरचे दिवे तेथे नसल्यामुळे चांदणे तेथे अधिकच आकर्षक बटू लागले. आम्ही एका पुलावर येऊन थांबले. पुलाखालूनच नदी वाहत होती तो पूल, ती नदी भवतीच हिरवळ या सगळ्यावर चंदेरी साज चढविला कि काय असे वाटत होते.
नदीतील पाण्यावरचांदणी पडल्याने हि चांदीची तर नदी नाही न असा भास होत होता. त्याप्रमाणे नदीच्या काठावरील वाळू खूळखुळीत आणि भयानक दिसत होती. तिथे पाहिल कि असे वाटले, दिवसा इतके सुंदर दिसणारी हि झाडे या पीठासारख्या स्वच्छ चांदण्यात अशी भयंकर का दिसते ? मी एक दूरच्या झाडाकडे पाहून सोडून दिले.
मी सारखा आकाशातील चांदण्या आणि चंद्रा कडे बागात होता आणि आजुबाजू असलेल्या सुंदर देखाव्याकडे पाहत होता. मी त्या देखाव्याने पूर्णपणे मोहित होऊन गेला होता. मी पहाटेच्या, संध्याकाळच्या सृष्टी सौंदर्यचे वर्णन अनेकदा वाचले होते, पण आज तर मी स्वता ते सौंदर्य अनुभवले होते. मला हे निसर्गा चे सौंदर्य खूप आवडले होते मी आणि माजा मित्र तिथेच पुलावर खूप वेळ निसर्गाचा आनंद घेत गप्पा मारत बसले होते.
समाप्त.
तर मित्रांनो तुम्हाला हे रात्रीच्या निसर्गाचे वर्णन कसे वाटले ? आम्हाला खाली comment करून सांगा. निसर्गा वर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि चे मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- चांदण्यांचा दिखावा.
- रात्रीचे निसर्ग.
- अनुभवलेले सुंदर द्रूष मराठी निबंध.
- रात्रीचा फेरफटका.
- निसर्ग माझा सोबती.
मित्रांनो आपल्यांना जर कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा. धन्यवाद.
0 टिप्पण्या