प्रत्येक मयदान शक्तीनेच मारता येत नाही, तर कधी-कधी मात्र एक युक्तीच जिंकण्या साठी पुरेशी असते तेव्हाच तर मराठीत म्हण आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आज मराठी निबंध शक्ती पेक्षा युक्ती मोठी हा मरठी निंबध आपल्या साठी घेऊन आला आहे तर चला निबंधाला सुरवात करूया.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ - छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांची गोष्ट आहे हि, शिवाजी महाराजांनी हिंदूचे राज्य स्थापन करायचा प्रयत्न सुरु केला होता. कधी हा गड सर कर तर कधी तो खजिना लुट असा त्यांनी मोगलांच्या राज्यात धुमाकूळ वाजवला होता. बिजापुरच्या राजाला ते आवडले नाही. त्याला वाटले आपल्या पदरी असलेला शिवाजीचा बाप शहाजी याची शिवाजीला मदत असल्या शिवाय हा "उंदीर" एवढे धाडस करणार नाही. शिवाजीला काबूत आण्यासाठी त्याच्या वडिलांना त्रास दिला पाहिजे.
बिजापुरच्या राज्याने शहाजीला कैदेत टाकले. एका लहानश्या कोठडित शहाजिला बंद करण्यात आले त्या कोठडिला हवा जावी म्हणून एक लहान छिद्र ठेवला होता.
आपले वडील अश्याप्रकारच्या संकटात आहेत हे समजल्यावर शिवाजीला फार-फार वाईट वाटले. ज्या पिताने आपल्याला जन्म दिला त्याच्यावर आपल्यामुळे संकट यावे यापेक्षा दुरदयवी गोष्ट कोणती ? पण किती झाले तरी शिवाजी स्वाभिमानी होते. बिजापुरच्या राजा कडे शरण जाने हे त्यांना पटन्यासारखे नव्हते.
काही युक्ती करून आपल्या वडिलांना सोडवले पाहिजे असे त्यांना वाटत होते, आणि मग त्यांनी एक युक्ती केली ती अशी.
शिवाजी महाराजांनी बिचापुरच्या राजाहून मोठो असलेल्या दिल्लीच्या बादशहा शहाजहान याला एक पत्र लिहिले त्या पत्रात त्याने असे लिहिले होते.
मला आपल्या पदरी नोकरी करायची फार-फार इच्छा आहे पण माझी एक अट आहे ती आपण पुरवली तर मी आपल्या पदरी नोकरी करीन ती अट अशी. माझे वडील शहाजी हे बिजापुरच्या राजाच्या पदरी नोकरी करीत आहेत त्यांना सध्या बिजापुरच्या राजाने चिडून कैदेत टाकले आहे. त्याच्या सुटकेची व्यवस्था केली तर मी आपल्या पदरी नोकरी करायला तयार आहे.
शिवाजी सारखा चपळ तरुण मराठा आपल्या पदरी राहिला तर दक्षिणेकडे पसरलेली अशांतता दूर होईल व आपणास एका शूराचा लाभ होईल, असा विचार करून शहाजान ने बिजापूरच्या राजाकडे "शहाजिस सोडावे" अश्या प्रकारचा हुकुम पाठवला.
बिजापुरच्या राज्याला दिल्लीचा हुकुम पाळणेच भाग होते त्याने राजांची सुटका केली ! मग शिवाजी महाराज कशाला जातात शहाजानच्या पदरी नोकरी करायला. शिवाजी महाराजानी कोणत्य ही शक्ति चा वापर न करता आपल्या युक्ति ने आपल्या वडिलांना सोडवले ह्यालाच तर म्हणतात शक्ती पेक्षा युक्ती मोठी.
समाप्त
तर मित्रांनो शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला ? शिवाजी महाराजांची युक्ती तुम्हला कशी वाटली आम्हाला खाली comment करून सांगा.
तसेच हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १० ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खालील दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.
- शक्ती पेक्षा युक्ती मोठी.
- थोर शिवाजी महाराज.
- चाणक्य बुद्धी मराठी निबंध.
- युक्ती सर्वात श्रेष्ठ.
तसेच तुम्हाला इतर कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.
0 टिप्पण्या