नमस्कार मित्रांनो आज आम्ही देशाचे एक थोर व्यक्ती, महापुरुष लोकमान्य टिळक या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. या निबंधामध्ये आम्ही बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याचे वर्णन केले आहे.
तर चला लोकमान्य टिळक हा मराठी निबंध सुरु करूया.
लोकमान्य टिळक.
भारताला खूप थोर पुरुष लाभले आहेत आणि त्यामधले एक थोर पुरुष म्हणजे लोकमान्य टिळक.लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापित करण्यासाठी खूप कष्ट केले, खूप चळवळी केल्या ज्यामुळे त्यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते.
केशव गंगाधर टिळक यांना बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जायचे. त्यांचा जन्म महाराष्ट्रामधील रत्नागिरीमध्ये चिखली या गावात २३ जुलै १८५६ मध्ये झाला होता.
बाळ गंगाधर टिळक हे लहान पणापासूनच अत्यंत हुशार व्यक्ती होते. त्यांचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले होते. टिळकांचे लग्न वयाच्या १६ वर्षी तापी बाई यांच्याशी झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असे.
लोकमान्य टिळक यांना शाळेमध्ये इंग्रजांच्या शिक्षण पद्धती आणि त्यांचा व्यवहार योग्य वाटला नाही. म्हणून त्यांनी ते काम सोडून दिले आणि पत्रकार बनायचा निर्णय घेतला, आणि मग ते लोककार्या मध्ये सहभागी होऊ लागले.
टिळकांनी इंग्रजांचा दूरव्यवहार अनुभवला होता, ते भारतीयांन बरोबर दूरव्यवहार करत असे म्हणून लोकमान्य टिळकांनी आपल्या काही मित्रांबरोबर मिळून शाळा आणि कॉलेजची निर्मिती केली. त्यांनी शाळेमध्ये नवीन शिक्षण पद्धती लघु केल्या आणि मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण केली.
केशव गंगाधर टिळक यांनी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करण्याच्या विडा उचलला आणि ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी चळवळी करू लागले.
टिळकांनी इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला, आणि इंग्रजांना ठणकावून सांगितले "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच". लोकमान्य टिळकांन पुढे इंग्रज सरकार सुद्धा नमवले होते. त्यांनी "केसरी" व "मराठा" या वर्तमानपत्राला सुरुवात केली आणि त्यामधून लोकांना जागृत केले. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव ह्या सार्वजनिक सणाची सुरुवात केली जेणेकरून लोक एकत्र येतील, असा त्यांचा त्यामागे विचार होता आणि ते तसे झाले सुद्धा.
केशव गंगाधर टिळक यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वतंत्र साठी झोकून टाकले. त्यांनी आपल्या लोकांसाठी फार काही केले होते आणि म्हणून त्यांना "लोकमान्य टिळक" असे म्हटले जाते. इंग्रजांनी त्यांना "फादर ऑफ इंडियन अनरेस्ट" ही उपाधी दिली आहे, कारण भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी प्रथम चळवळी सुरू केल्या होत्या.
लोकमान्य टिळक यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट सोसले, त्यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते. लोकमान्य टिळक यांनी अखेर श्वास १ ऑगस्ट १९२० ला घेतला आणि ते महापुरुष स्वर्गवासी झाले.
समाप्त.
लोकमान्य टिळक हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- बाल गंगाधर टिळक.
- केशव गंगाधर टिळक.
- थोर व्यक्ती महत्त्व - लोकमान्य टिळक.
मित्रांनो आपल्या हा मराठी निबंध कसा वाटला आणि आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या विषयी काय वाटते, तसेच जर आपल्याला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.
धन्यवाद.
4 टिप्पण्या
मला खूपच आवडला मझी खूप मदत झाली
उत्तर द्याहटवाThank you
Welcome :)
हटवाcar nibandh
उत्तर द्याहटवाOk 👍
हटवा