वसंत ऋतु वर मराठी निबंध | Spring season essay in Marathi.

नमस्कार मित्रांनो कडकडीत थंडी ने हैराण करून शेवटी हिवाळा ऋतू समाप्त होतो आणि आरंभ होतो तो म्हणजे वसंत ऋतूचा. वसंत ऋतू मधे वातावरण खूप प्रसन्न असते. आज आम्ही ऋतुराज वसंत ऋतु वर मराठी निबंध आणला आहे. तर चला मित्रांनो निबंध ला सुरुवात करुया.

This image is of spring season used for marathi essay on Vasant rutu

वसंत ऋतु.

हिवाळा च्या कडकडीत थंडीने लोक हैराण होऊन जातात कारण थंडी आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेली असते. आणि मग लोक सूर्याकडे पाहू लागतात की कधी त्यांना सूर्याची गर्मी मिळेल, आणि तेव्हा आगमन होते वसंत ऋतूचे. वसंत ऋतूच्या आगमना बरोबर रच लोकांचे थंडी पासून सुटका होते.

वसंत ऋतु हा सगळ्या ऋतूंमधून सगळ्यात चांगला ऋतु समजला जातो, करण वसंत ऋतू मधे नाही खूप जास्त थंडी लागत आणि खूप जास्त गर्मी सुद्धा लागत नाही. वातावरण खूप प्रसन्न असते आणि दिवसभर मस्त वारा वाहत असतो. वसंत ऋतूच्या ह्या विशेषठा मुळे वसंत ऋतु ला सर्व ऋतूंचा राजा सांगितले जाते. आणि म्हणून वसंत ऋतु ला ऋतुराज ही म्हटलं जातं.

ह्या प्रसन्ना पूर्वक ऋतूं मधे आपल्याला वातावरणामध्ये खूप सारे बदल बघायला मिळतात. हिवाळ्याच्या थंडीमध्ये झाडांची पाने गळू लागतात आणि वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पाने येऊ लागतात. बागां मधे फुले येऊ लागतात आणि आपल्या वातावरणात आपला सुगंध पसरवतात.

झाडांवरती फळे येऊ लागतात आंबा, जांभूळ, आवळा आणि संत्र खायला मिळतात. माझी आई वसंत ऋतूमध्ये आंब्याचे लोणचे बनवता, मला आंब्याचे लोणच खूप आवडते. या ऋतू मधे पशुपक्षी ही खूप प्रसन्न असतात म्हणून तर कोकीळ कु-कु करते आणि बागांमधे मोर नाचू लागतात.

शेतामध्ये गव्हाचे पीक डोलू लागते, आणि आता गव्हाचे पीक पूर्णपणे तयार झाले असते. म्हणून शेतकरी बंधू वसंत ऋतु ची वाट पाहत असतात. काही गावांमध्ये वसंत ऋतु निमित्त आपल्या आपल्या परंपरेनुसार छोटा उत्सव सुद्धा बनवला जातो.

वसंत ऋतूच्या प्रसन्न वातावरणामध्ये होळी चा सुंदर उत्सव बनवला जातो. होळीचा सण आपल्यांना एक चांगला संदेश देतो की दुःख नंतर नेहमी सुख येते.

या ऋतूमध्ये वातावरण इतके प्रसन्न असते आणि आम्हाला आंब्या सारखे स्वादिष्ट फळ खायला मिळतात म्हणुनच वसंत ऋतु मला फार आवडतो आणि वसंत ऋतु हा माझा आवडता ऋतु आहे.

समाप्त.

मित्रांनो तुम्हाला वसंत ऋतू कसा वाटतो आणि तुम्हाला हा ऋतू का आवडतो आम्हाला खाली comment करुन नक्की सांगा.

वसंत ऋतु वर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुल आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • ऋतुराज वसंत ऋतु.
  • माझा आवडता ऋतू वसंत ऋतू.

तर मित्रांनो आपल्यांना वसंत ऋतु वर हा मराठी निबंध कसा वाटला आणि आपल्यांना इतर कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या

  1. खुप सुंदर.., विरहाची वणी..,

    उत्तर द्याहटवा