Baba Amte essay in Marathi | बाबा आमटे मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो बाबा आमटे हे आजच्या आधुनिक काळचे संत होते, त्यांनी आपले सर्व आयुष्य घोरगरिबांसाठी आणि देशासाठी समर्पित केले होते. आज आम्ही बाबा आमटे या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहेत, तर चला ह्या निबंधांला सुरुवात करूया.

This image is of Baba Amte a indian socila worker

बाबा आमटे.

मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांचा जन्म महाराष्ट्र मध्ये वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट याठिकाणी २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. बाबा आमटे यांचे वडील ब्रिटिश गव्हर्मेंट मध्ये एका चांगल्या पदवी वर होते, बाबा आमटे यांना जीवनात कसलीही कमी नव्हती, ते खूप श्रीमंत होते. त्यांना त्यांचे वडील लहानपणापासूनच बाबा या नावाने हाक मारत असे म्हणून त्यांना बाबा आमटे ह्या नावाने ओळखले जाते.

बाबा आमटे हे देवीदास आमटे यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र होते त्यांच्याकडे खूप जमीन आणि श्रीमंती होती. बाबा आमटे जेव्हा १४ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्याकडे स्वतःची बंदूक होती. जेव्हा बाबा आमटे १८ वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्याकडे एक स्वतःची सुंदर स्पोर्ट्स कार होती. लहानपणीच बाबा आमटे यांना गरीबा बरोबर होणाऱ्या मतभेदांची जाणीव होती.

बाबा आमटे हे एन एल बी झाले होते ते वर्धा जिल्ह्यामध्ये वकिली करत होते. त्यांनी १९४२ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सहभाग घेतला होता, याबरोबरच त्यांनी भारतामध्ये अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला होता जसे की नर्मदा बचाव आंदोलन. बाबा आमटे यांनी आपला काही वेळ सेवाग्रम मध्ये घालवला होता तिथे त्यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव पडला होता. जेव्हा महात्मा गांधीजींना माहीत झाले हे बाबा आमटे यांनी एका मुलीला क्रूर इंग्रज सैनिका पासून न घाबरता वाचवले होते तेव्हा गांधीजींनी बाबा आमटे यांना "अभय साधक" ही उपाधी दिली होती.

बाबा आमटे यांना समाजातील गरिबांवर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव होती. ते एक खऱ्या अर्थाने समाजसेवक होते जे नेहमी लोकांच्या मदतीसाठी तत्पर राहत असे. पण समाजसेवा करत असताना त्यांना काही लोकांचे निंदेचे घाव सोसावे लागले, काही लोक त्यांना ढोंगी, पाखंडी सांगू लागले होते, पण बाबांना कशाचे ही दुःख नव्हते आणि त्यांनी मग आनंदवनाची निर्मिती केली.

आंधळे, मूकबधिर आणि रोगाने पिडीत असहाय्य लोकांना समाजात कोणीही जगा देत नसे त्यांना कोणाचाही आधार नव्हता. कुष्ठरोगाने पीडित लोकांचे वाईट हाल होत असे, लोक अशा व्यक्तींना जवळ सुद्धा येऊन देत नव्हते. अशा सर्व कुष्ठरोग पीडित लोकांचा आधार बाबा आमटे बनले, या सर्व लोकांना बाबा आमटे यांनी आपलेसे केले आणि त्यांच्या बरोबर आनंदवना मधे राहू लागले.

बाबा आमटे यांनी आपले सर्व आयुष्य लोकांसाठी आणि आपल्या देशासाठी समर्पित केले आणि या कामात त्यांना त्यांच्या परिवाराचा सुद्धा पाठिंबा मिळाला होता. बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी कुष्ठरोगाने पीडित लोकांसाठी आनंदवना मध्ये हॉस्पिटल ची निर्मिती केली.

बाबा आमटे हे या आधुनिक युगाचे खरे संत होते आणि खऱ्या अर्थाने एक समाजसेवक होते. त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री ने १९७४ मध्ये सन्मानित केले होते.

समाप्त.

मित्रांनो तुम्हाला समाजसेवक बाबा आमटे यांच्या बद्दल काय वाटतं खाली comment करुन सांगा.

हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • समाजसेवक बाबा आमटे.
  • आजचे संत बाबा आमटे.
  • बाबा आमटे यांचे निमित्त आनंदवन.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कुठल्याही इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन नक्की सांगा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या